सामाजिक माध्यम वापर
महाराष्ट्रात राहुल गांधी येताय. मराठी माध्यमे याचे किती आणि कसे प्रसारण करतील याची कल्पना नाही. पण सामाजिक चर्चा विश्व कलुषित होऊ नये म्हणून काँग्रेस कार्यकर्ते, महाविकास आघाडी पक्षाचे कार्यकर्ते,भारत जोडोचे समर्थक, या यात्रेविषयी सद्भावना असलेले लोक, पुरोगामी लोक, धर्मद्वेषाच्या विरोधी हिंदू लोक यांनी काही बाबी जाणीवपूर्वक पाळायला हवा.
- प्राधान्य ठरवणे : या काळात अनेक बातम्या, वादविवाद, चर्चा उफाळून येतील. जेणेकरून भारत जोडो कव्हर न केल्याचे पाप माध्यमाच्या माथी लागू नये. पण आपण सामाजिक माध्यमात कोणत्या विषयावर बोलायचे, टाळायचे आणि कोणते विषय लावून धरायचे हे ठरवायला लागेल. म्हणून भारत जोडो ला प्राधान्य द्यायचे.
- दुर्लक्ष करणे : पूर्णतः राहुल गांधी यांचे भाषण, मुद्दे, यात्रा शेअर करायला हवी. जे राहुल गांधी यांचे समर्थक नाही पण भारत जोडोविषयी सहानुभूत आहे त्यांनी भिडे गुरुजी, राणा, कडू, शिंदेची शेती ,फालतू राजकीय वक्तव्य याना महत्व देणे टाळूया.
- शेअर करणे : जास्तीत जास्त शेरिंग, स्टेटस ठेवणे, गाणे असलेले स्टेटस ठेवावीत
- प्रोत्साहन देणे : सामाजिक माध्यमात या संदर्भात येणाऱ्या मित्रांच्या पोस्टला लाईक, comment करून लाईक वाढवाव्यात.
5.सकारात्मक राहणे: सगळीकडे सकारात्मक कंमेंट कराव्यात.
6.पेशन्स ठेवणे: अगदी टोकाची विषारी, जहर असणारी, तद्दन फालतू वक्तव्य, प्रसंग महाराष्ट्रात होतील. कशाचाही बातम्या होती. अगदी व्यक्त व्हावे वाटेल पण पेशन्स ची परीक्षा म्हणून दुर्लक्ष करणे.
आपण सगळ्यांनी हे पाळले तर मुख्यप्रवाही मीडियाची गरज पडणार नाही. लोकशाही वादी लोकांना सत्ताधारी बाजूला ठेवून विरोधी पक्षाच्या भूमिका समजून घ्यायला यामुळे मदत होईल.
- हर्षाली घुले