You are currently viewing भारत जोडोसाठी चंद्रपुरकरांचा उपक्रम “मुठभर माती, राहुल गांधींच्या हाती”

भारत जोडोसाठी चंद्रपुरकरांचा उपक्रम “मुठभर माती, राहुल गांधींच्या हाती”

जाहीर निमंत्रण
दक्षिणायन महाराष्ट्र
नागरिक सभा (Civil Society Meeting)चंद्रपूर. दि. 6 नोव्हेंबर 2022

वेळ: दुपारी 12.30 ते 2.30
स्थळ : धनोजे कुणबी सभागृह ,वडगाव फाटा ,चंद्रपूर

नागरिक सभेच्या या अभियानाचा उद्देश : भारत जोडो यात्रेत भारतातील
प्रगतीशील आणि नागरी सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. जातीय, धार्मिक विद्वेषाचा आणि सामाजिक विषमतेचा बिमोड करत संपूर्ण भारत जोडणाऱ्या भारत जोडो यात्रेचे नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्रात आगमन होत आहे. भारत जोडोतील त्या यात्रींशी संवाद साधणे आवश्यक आहे. फॅसिझम, कम्युनलिझम आणि क्रोनी कॅपिटलिझमच्या विरुद्ध पुन्हा एकदा आपण एकत्र येत आहोत.त्या दृष्टीने भूमिका निश्चित करण्यासाठी व संवाद साधण्यासाठी आपणास आमंत्रित करीत आहोत.

तसेच या सभेच्या माध्यमातून लोकजागर अभियाना मार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘मूठभर माती राहुल गांधीच्या हाती,मातीचा सत्याग्रह भारत जोडोच्या समर्थनार्थ’ अंतर्गत आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील मूठ भर माती आपण सर्वांच्या वतीने लोकजागर अभियान प्रतिनिधीना देणार आहोत.
आपणही एक सुजाण नागरिक म्हणून भारत जोडो यात्रेत सहभागी होऊ
या सभेत आपल्या सोबत संवाद साधण्यासाठी अरुणा सबाने जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व साहित्यिक महाराष्ट्र समन्वयक,दक्षिणायन.
तसेच जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते,विचारवंत, कवी,साहित्यिक प्रा. श्री ज्ञानेश वाकुडकर .
निवृत्त IAS अधिकारी श्री ई .झेड खोब्रागडे उपस्थित राहतील.
आपल्या सर्वांना सादर निमंत्रण.
विनीत-
सभा आयोजक –
1.उमाकांत धांडे .
2.डॉ.ऍड.अंजली साळवे.(दक्षिणायन प्रतिनिधी)

Leave a Reply