You are currently viewing भारत जोडो यात्रेशी जोडून घेणे गरजेचे – चंद्रकांत वानखेडे

भारत जोडो यात्रेशी जोडून घेणे गरजेचे – चंद्रकांत वानखेडे

भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात प्रवेश करते आहे.
या यात्रेत मीही सहभागी होणार आहे.
ही माझी गरज आहे.
या कठीण काळात मी यशस्वी “बुहाऱ्यां” सोबत नव्हतो.
तर याच काळात अयशस्वी ठरवलेल्या चिरंतन मुल्यांसोबत मी चिटकवून रहाण्याच्या प्रयत्नांत होतो हे स्षष्ट करण्यासाठी मला भारत जोडो यात्रेशी जोडून घेणे गरजेचे आहे.
मी त्या यात्रेसोबत किती चालू शकेल हा माझ्यासाठी प्रश्न जरी असला तरी मी त्यांच्या सोबत दोन पावलं का होईना होतो हेच माझ्यासाठी महत्त्वाचे.
त्याने काय होईल वगैरे सारखे प्रश्न माझ्यासाठी अप्रस्तुत आहे.
आज कधी नव्हे ती टि.व्ही.चॅनेलला माझी आठवण आली.
राहुल गांधी भारत जोडो यात्रेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काहीच बोलत नाही यावर तुम्ही बोला असा त्यांचा आग्रह.
ज्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांना राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचच सोयरसुतक नाही त्यांना आता राहुल गांधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काहीच बोलत नाही याची चिंता.
पुतण्या मावशीच्या या प्रेमाला बळी पडण्याइतपत मी दुधखुळा खचितच नव्हतो.
मी त्यांना नकार दिला.
अजून यापुढे काय काय होईल माहित नाही.
पण मी या यात्रेसोबत १८-१९ नोव्हेंबरला बुलढाण्यात या यात्रेसोबत असणार आहे एवढे निश्चित.
जमलतर तुम्हीही या.

चंद्रकांत वानखडे

Leave a Reply