तो निंघना
दक्षिनकडतीन उत्तरकडे
उत्तर नसनारा प्रश्नस्ले धक्का लावत
ईवान, जेट, हेलिक्याप्टर, बुलेटप्रूफ गाड्या, समदं हातशे राहीसनबी
फफुटाना रस्तावरतीन तो निंघना….
गर्दीना गैरफायदा लेत
बापन्या चिंधड्या व्हयेल परदेशमायीन
आखो त्याच गर्दीवर इस्वास टाकत
दांगडोलेबी लाजाडत तो निंघना…
पह्यलेबी असाच राजा निंघेत
अश्वमेध कराले,
सैन्य लिसन
जिकत जिकत
रंगतना सडा शिपडत—
पन तो निहत्ता शे
परेम आन संवादन हत्यार लिसन
राज्य जिकानं त सोडाच
निवडनूक जिकानीबी गोट तो बोलत नही
पार्टीन्या सीमा वलांडीसन समइचारी लोकेस्ले संगे लिसन तो निंघना…..
फक्त येई त्याले पिरेमखाल आलिंगन देत,
एखटा पडेल
गावगाडामा हारायेल
तुटेल, आन
हातबल मानसेसले
मायानी ऊब देत तो निंघना…
त्येन्हा वयले न सोभनारा ,
घरमधला मायाऊ मोठा मानूस
धाकलामोठास्ले त्येनाम्हा भेटसं,
कोनले भाऊ, कोनले बाप,
कोनले लेक आसा नाताम्हा हाऊ पन्नाशीना पोरगा मया लावस….
त्याले भेटीसन रडी रायना मानशे
त्यास्ना आसूम्हा वाही रायनात,
यवस्थानी त्येस्नावर करेल सोसनना घाव
नुसतं चालीसन व्हयी काय ?
लोकेसशी बोलीसन व्हयी काय ?
हाऊ दांडी यात्रापासीन
भूदान यात्रापावत
आन चंद्रशेखर ते बाबा आमटेलोंग
मज्याक उडावनारा
आयतिहासिक प्ररश्न त्येलेबी ईचाराइ जाई..
पन
आसा परश्नना उत्तरे वर्तमान
नही
तर
इतिहासच देत रहास…
कवी : हेरंब कुलकर्णी, अकोले, अहमदनगर
अहिराणी अनुवाद: नितीन खंडाळे
-चाळीसगाव जि जळगाव