You are currently viewing भारत जोडो यात्रा – गांधी भवन ते शिवाजी पुतळा, पुणे

भारत जोडो यात्रा – गांधी भवन ते शिवाजी पुतळा, पुणे

सस्नेह निमंत्रण

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत निघाली आहे. या सर्व यात्रेत ते भारताच्या विविध संस्कृतीचे दर्शन या देशाला घडवत आहेत, त्या विविधतेचा ते आदर करत आहेत आणि त्या विविधतेतील एकता समजून घेण्याची वृत्ती सर्वांच्या अंगी यावी यासाठी खरेतर ही भारत जोडो यात्रा आहे. ही यात्रा पक्षीय अंगाने न पाहता सर्व संस्कृती, सर्व जाती आणि सर्व धर्मियांना जोडणारा सामाजिक उपक्रम म्हणून या यात्रेकडे पाहायला हवे आणि सर्वांनी यात सामील व्हायला हवे.

ही यात्रा महाराष्ट्रात काही दिवसांनी येत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना विसरून चालणार नाही. म्हणून आपण भारत जोडो प्रभात फेरी, कोथरुड येथे आयोजित करत आहोत
चला भारत जोडण्याच्या क्रांतिकारी अभियानात सहभागी होऊ या. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा आपला देश बदलत आहे. आपल्या भागात या यात्रेच्या समर्थनार्थ प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर प्रभात फेरी रविवार ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता गांधी भवन कोथरूड येथून सुरू होऊन, ८.३० वाजता शिवाजी पुतळा कोथरूड गावठाण येथे सांगता होणार आहे.

आपल्या भागातील विभाजनकारी शक्तींच्या विरोधात प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काही कृती करणे आपल्या सर्वांचे प्रथम कर्तव्य आहे. आपण सर्वांना विंनाती आहे की या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

पदयात्रेचा क्रम खालीलप्रमाणे

  • महात्मा गांधी स्मारक (गांधी भवन) येथे गांधीजींच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून यात्रेला सुरुवात
  • कुमार परिसर मार्गे ही यात्रा सागर कॉलोनी, मुठेश्वर चौक, संगम चौक, सुतार दवाखाना चौक, भेलके चौक पासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडे समारोप होईल…!!

आपल्या मित्रमंडळी सोबत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे ही नम्र विनंती…!!

अधिक माहितीसाठी संपर्क

अमर शिंदे 70383 43353

उमेश ठाकूर 9049042048

This Post Has One Comment

  1. Balasaheb V.Gadade

    Nice Yatra 👍 Nafrat chodo Bharat jodo.

Leave a Reply